@ Social Media च्या विळख्यात असताना.....!!




भावनारहीत झालीय कि काय आजची पिढी......???????? हा प्रश्र्न मनात नाचत नाचत फार धिंगाणा घालतो राजेहो,  हे विचारत कि खरंच आजची पिढी social media च्या विळख्यात एवढी गुंतलीय कि बस रे बस, जणू का एखादा गोड पदार्थाला लागलेल्या मुंग्याच आहेत असंच वाटायला लागतं आणि वाटायला लागते कि यार हि पिढी भावनेला तर विसरणार नाही नं....!! कारण येथे आता बुद्धी असून, भावना असून नसल्यासारखे वागायला लागलीय आजची ही पिढी. 

मनुष्याला मित्र बणवायचे सोडून आज हीच पिढी social media च्या माध्यमातून फक्त दोन-तीन दिवसांच्या message ने मित्र बनवायला लागलीय. हे खरंय कि मित्रपरिवार तुम्ही वाढवताहेत पण मात्र हाच तो मित्रपरिवार जो मदत हवी असताना कामीही येत नाही, मग हाच तो social media का ज्याच्यासोबत तुम्ही अन् मीही, कारण मी ही गंगेच्या पाण्यात धुवून आलीय असंही काहिसं नाहीये.....!! तासनतास वेळ घालतोय...... म्हणूनच म्हणतो मित्रपरिवार कमी असला तरी काही बरं वाईट होणारं नाहीये तरीही सांगतो निदान तेवढे तरी जिवलग मित्र नक्किच असायला हवेत जे वेळ आल्यास कामी येईल.... शेवटी त्यांचे "मी आहे ना, मग घाबरायची काय गरज आहे.....!"  हे वाक्य ऐकून तर मनाला फार भारी वाटते एकदम झक्कास, जसा कि राजाच झालोय असंच वाटायला लागते मग. मग मीही ठरवूनच सोडते काहीही झालं तरी चालेल राव पण माझ्या या जिवलगांचा साथ कधीच नाय सोडणार मी, शिवाय काहीही झालं तरी चालेल, कारण त्याकाळी यांनीच मला धीर दिलाय....मग मीही त्यांच्यासाठी हे छोटं काम करावेच आन् करावं आणि माझं ते कर्तव्यच आहे कि....!!

पण शेवटी कितीही social media चे addict होऊ द्यात भावना व्यक्त करायला हे सर्व काही कामी येणारं नाहीये त्यासाठीच मानवी मित्र हवेच असतात जे एक आधारासमान असतात. म्हणून या social media च्या जगात आलोय तर खरी पण थोडा वेळ काढून आपल्यातील आपल्या व्यक्तींसोबत थोडा वेळ काढून बोलावं म्हणतो थोडं त्याच्याही जिवाला बरं वाटेल. कधी काळी हेच एक जगण्याचं कारणं बनून जातं हेही कळत नाही....पण जगणं हे खरंच न्यारं होत राव तेव्हा.......!!

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........