*आनंद त्या निळ्या आसमंताचा......!!*




थोडं निळ्या आकाशी बघत बघत आशा आकांक्षांचा वारा अंगी भरावा,
विचारांच्या समुद्रातून पोहत पोहत सकारात्मकतेचा excellator चालू करून कधी कधी नकारात्मकतेचा break ही लावावा....!!

ध्येय ध्यानीमनी ठेवत भुतकाळालाही आठवत एक एक पाऊल पुढे टाकावा,
मेहनत करावी प्रचंड सोबत आई-बाबांच्या कष्टाची जाणीव अन् ध्येयाचं photo मनात ठेवावा..!!

परीस्थितीची पारख करत अनुभवांचा माठ हळूवार भरावा,
स्पर्धेच्या युगात जगतोय म्हणून विविध जीवनकलेची शिकवण घेत श्र्वास आत घ्यावा...!!

ध्येय असावे उच्च नि उदात्त मात्र स्नेहसंबंध आपल्या मातीशी सदैवच जुळावा,
आज आहोत उद्याचं माहीत नाही हे ध्यानी ठेवत अहंकारापासनं मन दूर ठेवावा...!!

एक एक क्षणाचा आनंद घेत वेळेला मित्र बणवत माणुसकीचे भान ठेवत दिवस काढावा,
शिकवणी त्या गुरुजणांच्या लक्षात ठेवत एक आदर्श बनण्याचा कायमच प्रयत्न करावा.....!!


- भा.उ. काळे


Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........