थोडं स्वत:त डोकावून पाहू यात....!!
स्वत:ला घडविण्यात एवढं गढून जावं कि, सुख अन्
दु:ख, एकांत अन् विरह .... यांच्यातील कोडे सोडविण्यासाठी वेळच मिळणार नाही तसेच त्यांचा कडू गोड परिणाम आपल्या मनावर किंचित देखील पडणार नाही. कारण बरेच जण आपल्या आयुष्यात येतात अन् काही मनात घर तयार करता करता निघूनही जातात पण काही मात्र कायमस्वरूपीच ध्यानीमनी राहतात. का .....?? तर कारण माहीतेय पण कोड अजूनही उलगडलेलं नाही, त्या कारणाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर मनाला खोलवर घाव मिळत गेले..... म्हणूनच वाटतं आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी वेगळं शिकवून जाते पण त्यांच्यासाठी तयार झालेलं घर मात्र कायमचंच राहून जातं. त्यामुळेच वाटतं कधी कधी अन् बर्याचदाही ती व्यक्तीच जीवनात येऊ नये जी कधी आपली होऊच शकत नाही तर फक्त आपलं असण्याचा कधी देखावा करणारी....!! कारण त्यामुळे त्या व्यक्तीला काहीही फरक पडणारा नसतो कि, कदाचित आपल्यामुळे तिला ही दुखावलं गेलं असेल. म्हणूनच म्हणतो नकोच ती नाती अन् नकोच ते बंध जे मनाला आतून दूखावणारे.....मनाला पार खोलवर घाव करणारे.... मनाला अक्षरशः तोडून टाकणारे.... अन् नकोच ती व्यक्ती जिच्यामुळे आपण आपल्या आनंदाच्या खजिन्याची चावीच कुठे हरवल्यागत वाटायला लागेल......!! अन् नकोच त्या भावना ज्यामुळे स्वत:चंच अस्तित्व विसरलं जाईल.....!! त्यामुळे नकोच वाटायला लागते ती व्यक्ती जिच्यावर अतोनात विश्वास केला होता पण तिच्यामुळेच दुसऱ्या अनेक चांगल्या मनावरही विश्र्वास ठेवण्याची प्रचंड भीती मनात मोठं घर करून बसणारी.....!!
पण काहीही असो जी माणसं आपली असतात ती कितीही दुर असली तरी दुरावण्याची भीती मनात येत नाही. ती दुर गेली तरीही दूर आहे असं जाणवत नाही, कारण ती दूर जाऊनही जवळ येतेच.....हे मात्र तेवढंच शाश्वत सत्य आहे.......!!
- भाग्यश्री उमेश काळे
This comment has been removed by the author.
ReplyDeleteजे कळायला लोकांच आयुष्य निघून जातं पण भाग्यश्री तू ते खूपच कमी शब्दात आणि अतिशय अप्रतीम अश्या शैलीत शब्दांकित केलं. Hats off to you.... Godspeed
ReplyDeleteThank you so much sir🙏😊
DeleteGood bhagyashri ��तुझे खुप छान विचार आहेत �� मला खुप काही शिकायला मिळाले ��keep it up
ReplyDeleteThanks dear ❣️😊
Delete👍🏻 खरंच भारी लिहलंय..
ReplyDeleteअप्रतिम भाग्यश्री
ReplyDelete