कधी कधी चालत असताना या जीवनाच्या वाटेवरती आपल्याला अनेकजण भेटतात; पण त्यातील काहींशी झालेली भेट ही कायमस्वरूपी ध्यानात राहते. त्यातील काहीजण आयुष्य कसं जगावं हे शिकवून जातात तर काही अविस्मरणीय अनुभव देऊन जातात. परंतु प्रेमाने बोललेले त्यांचे ते दोन शब्द चिरकाल ध्यानीमनी राहतात, तर कधी त्याच बोलण्याने मनाचं अतोनात खच्चिकरण होते. 

ते बोलणे....
याच गोड मुखातून निघालेल्या दोन शब्दाने मनाचे घाव पुसता येते तर, याच मुखातून निघालेल्या दोन व्यर्थ शब्दांनीच मनाला आरपार घाव होतात. म्हणूनच म्हटलं जातं एकदा झालेला घाव मात्र भरून निघेल पण एकदा निघालेला शब्द पुन्हा परत घेता येत नाही. त्यासाठी कुठे काय बोलावं याच भलंमोठं ज्ञान असणं माणसाला माणूसकी ने परिपूर्ण बणवतं.

म्हणूनच म्हणतो ते बोलणे..... ते शब्द असे असावेत जे इतरांनाही आनंद देऊन जाईल.....
अनेकांच्या मनातील नकारात्मकता कायमस्वरूपीच नष्ट करुन सकारात्मकतेचं अनोखं बीज पेरले जाईल...... 
कारण आपण कितीही स्वातंत्र्यपणे जगण्याचा प्रयत्न केला अन् विचारांनीच स्वातंत्र नसलो तर त्या स्वातंत्र्याला स्वातंत्र म्हणताच येणार नाही हो......
म्हणून दिलखुलासपणे सदाकाळ अन् सदाबहार आनंदाचे गाणे गात जगावं पण शब्दाशी मात्र प्रामाणिक राहावं.....!!

शेवटी ज्याचे त्याचे विचार....!!



                                                     - भा.उ. काळे 

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........