थोडं ONLINE होऊन जगावं म्हणतो.......

या सोशियल मिडीयाच्या जगात आलोय,
तर म्हटलं थोडं जगताना ऑनलाईन होऊन जगावं म्हणतो....

WHATSAPP मध्ये एक चांगलं Option आहे राव ते म्हणजे Block,
पण जीवनाच्या WhatsApp मध्ये जेव्हा आणू ते Option तर म्हटलं वाईट विचारांचा बंदच होईल Clock,
म्हणूनच आनंदी जीवनासाठी Block हा Option आणावं म्हणतो....

Facebook मध्ये Post हा  Feature फारच भारी आहे, 
ज्यामुळे विविध गोष्टींचा होतो सतत प्रचार,
अन् जगताना आयुष्याच्या Facebook मध्येही तयार करावं Post हे फीचर,
ज्यात करता येईल प्रसार केवळ चांगले विचार,
म्हणूनच आपल्या सोबत इतरांचं जीवन सुखी-समाधानी होण्यासाठी Post हे फीचर आयुष्यात आणावं म्हणतो.....

WhatsApp उघडल्यावर त्याचा/तिचा Last seen कधी लपून बघावा वाटतो,
पण मात्र आपल्या स्वत:मध्ये डोकावून बघितलेला तो Last seen कुठेतरी विसरत जातो,
म्हणूनच "स्व" ची खरी ओळख व्हावी यासाठी तो Last seen  बघण्याची कधी वेळच येऊ नये 

Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........