चालतांना या आयुष्याच्या वळणावरती.......!!
येतात अनेक अनुभव अन् भेटतात व्यक्ती,
चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!!
लागतात ठोकरा, येतं कधी कधी अपयश,
पण उभं राहावं उत्साहाने अन् घ्यावा एकच ध्यास नि एकच प्रेरणा,
चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!!
अनेक व्यक्ती येतात अन् भरपूर निघून जातात,
पण त्यातील काही देतात अनुभव तर काही देतात लाखोंच्या मोलाच्या शिकवणी,
तर त्यातीलच काही अनमोल व्यक्ती धरतात हातात हात कायमस्वरूपी अन् देतात धाडस जगण्याचं,
चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!!
निसर्गातील प्रत्येक गोष्ट शिकवत असते काही ना काही,
पण मात्र ध्यानात ठेवावं सदैव, वाईटातून चांगलं अन् चांगल्यातून वाईट काढून घेण्याचं शिकावं कधीही,
चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!!
कला असावी अन् शिकावी ही एकतरी जगताना,
हास्य असावे क्षणोक्षणी जरी असेलही अनंत दु:ख यातना,
चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!!
- भा.उ. काळे
Comments
Post a Comment