जगावेगळ्या माणसांच जगावेगळं आयुष्य.......!!


हा ईश्र्वर खरंच खुप कलाकार आहे.....
याच माणसांच्या जगात वावरत असताना आलेला हा अनोखा अनुभव. चालता चालता अनेकजण भेटली नि त्यांच्याशी भेटल्यावर अनेक अनुभवांचा खजिना लाभला अन् तेव्हा कुठे कळालं कि, याच जगात एका अनोख्या व्यक्तींचं जगही आहे पण अजुनही माझ्याच समाजाने त्यांना आपलं केलेलं नाही..... खुप खंत वाटते की ती ही सजीवच आहेत मग का त्यांच्याकडे आजही म्हणजेच ३७७ च्या कायद्यानंतरही आपल्या देशातील लोकांच्या माणसिकतेवर अजुनही परिणाम झालाय असं जाणवत नाहीए.

मान्य आहे की, ही विचारसरणी ही बदलेल; पण त्या आधी एक चांगला माणूस म्हणून माणूसकीला अंगिकारुन थोड्या त्यांच्याही भावना समजून घ्याव्या म्हणतो....! कारण याच समाजाने त्यांना न स्विकारल्या मुळे त्यांना त्यांची स्वत: ची ओळख स्वत:शीच करून घेणे ही खूप कठीण होते. कारण लोक कीतीही शिकुन मोठं होऊन चांगले विचार ही आत्मसात केलेत पण त्यांना यांच्याबद्दल कधी काही शिकायलाच मिळालं नाही तर इथे त्यांचीही काय चुक म्हणावी. परंतु एक माणूस म्हणून घ्याव्यात समजून त्यांच्याही भावना अन् द्यावा त्यांना आधार खंबीरपणे उभे राहण्याचा हेच सदैव वाटत आले आहे...! कारण मी बर्याचदा स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करताना खूप यातना होतात हे थोडं फार मला जाणवलंय.

तुम्हाला वरील माहिती वरुन कळले असावे की, मी कुणाबद्दल बोलत असावं.....तर होय मी LGBTQ बद्दलच बोलत आहे. कारण ह्या विषयावर बोलणं माझ्यासाठी सदैवच कुतुहलाचा विषय राहीलेला आहे.

यावरून मला संत तुकाराम महाराजांच्या दोन ओळी आठवतात, "ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान !" 




Comments

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........