"एक आशेचा किरण.......!"
माझ्याकडून सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा !! एक शुभेच्छा यासाठी की स्वत़ाचा सूर शोधून त्यामधे उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी. हाताचे पाच बोटही सारखे नाहीत तर प्रत्येकाचं क्षेत्र आणि विचार हे कसे सारखे येणार ? स्वत़ाचा एक विशिष्ट सूर शोधायचा असतो की,आपण कशात उत्तम आहोत. ज्यामुळे त्या निवडलेल्या सुरामुळे आपलीच एक अनोखी मैफल तयार होईल, जे करत असताना कुठे ही रटाळवानं वाटचाल नाही नि सोबतच त्यामधून आपल्याला आनंदही प्राप्त होईल.
क्षेत्र कुठलंही असो, जर आपण त्यात मन लावून काम केलं तर त्यामध्ये नक्कीच विश्र्वसनीय कामगिरी आपण करु शकतो. क्षेत्र निवडताना आपल्या क्षमतांचा विचार करणेही फार महत्त्वाचे असते. स्वत़ाला स्वत़ाची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण सव्त:ला आणि शत्रूला पूर्णपणे ओळखले तर आपला विजय हा सर्वकाळ निश्र्चित आहे. माझ्यामते आपल्या सभोवती असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना कधीही कमी लेखू नये. कारण कुठेतरी त्यांच्यात असा गुण असतो ज्यामुळे तो आपल्याही पेक्षा पुढे जाऊ शकतात. हे जाणले की, आपण अधिकाधिक सक्षम बणण्याची तयारी करू.
निसर्ग खूप अद्मुत आहे. नदी ही कायम प्रवाही असते. त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीत निष्णात होण्यासाठी सतत प्रवाहीअसावे लागते. एका दृष्टीने बघितल्यास पाणी हे खुप सौम्य आहे. ही एक छोटीशी गोष्ट आहे, किनार्यावर दगड असल्यास त्यावर वारंवार पाणी आदळते नि एक दिवस त्या पाण्यामुळे त्या दगडाला ही आकार येतो. इथे केवळ एकच ते म्हणजे सातत्य. ही सातत्यता आपल्याला पूर्णत्वाकडे निघते.
"ध्येयासाठी धडपडणार्याला आनंद काही
काही वेगळाच असतो, आजचा
दिवस नसला तरी उद्याचा दिवस
हा नक्कीच आपला असतो.........!"
Comments
Post a Comment