" अपमान स्वाभिमानाचा..........!"

                            " आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव
                                           हेही गरजेचे असतात,
                                        कारण यामुळेच पेटून उठतो
                                               तुमचा स्वाभिमान
                                        जागी होते जिद्द आणि मग
                                         उभा राहतो आपल्यातला
                                        खंबीर आणि अभेद्द माणूस........!"
                   
                 जीवन हे खुप अनमोल आहे; पण या मिळालेल्या जीवनात काहीतरी वेगळं करुन दाखवने हे आपल्या हातात आहे, जेणेकरून एक विश्वसनीय यश आपल्याला गवसनी घालत राहील. हवं त्या क्षेत्रात अनोखं यश मिळवणं हे सोपं नाही पण अशक्य असं देखील नाही. जिद्द, मेहनत करण्याची तयारी आणि याला सकारात्मकतेची जोड असेल तर कुठंलही अशक्य काम हे शक्यता होताना दिसते.
                 समाजामध्ये वावरत असताना अनेक चांगल्या- वाइट गोष्टींच्या अनुभवांची सांगता होते. अनेकांशी चर्चा केली असता त्यामध्ये काहीजण आपल्याला मार्गदर्शन करून प्रेरित करतात. त्यांचे चांगले विचार बर्याचदा प्रोत्साहित करतात, त्यामुळे ज्ञानभंडार वृद्धिंगत होण्यास मदत होते. कधीकधी आपल्यातील कलागुणांना वाव मिळतो तर कधी चुका काढून त्या सुधारण्याचा एक विशिष्ट प्रयत्न वडीलधाऱ्या व्यक्तींकडून क्षणोक्षणी केला जातो. तेव्हा नक्कीच आपला स्वाभिमान दुखावला जातो; पण संयम ठेवला आणि थोडा विचार केला तर लक्षात येईल कि, त्यामुळे आपण आपली वाटचाल ही यशोशिखराच्या दिशेनेच करत आहोत.म्हणूणच तर तेव्हा झालेला अपमान हा सदैव टर्निंग पॉईंट ठरतो.
                   अपमान झाल्यास आपल्यातील स्वाभिमानाला ठेच पोहोचते नि थोडं वाईटही वाटते; परंतु संयम बाळगुन तो अपमान पचवण्याची क्षमता असायला हवी, ज्यामुळे त्याचा फायदा हा फक्त चांगल्यासाठीच असेल तेव्हाच अन्यथा नाही. कारण कधीकधी अशा सवयींमुळे आपल्यातील माणूसच नव्हे तर आपल्या क्षमता देखील दृष्टीस पडतात आणि एक संधी उपलब्ध होते. त्यामुळेच आपल्यातील कलागुणांना वाव मिळतो व सोबतच कमकुवत ज्ञान अधिकसक्षम बनविण्यासाठी यशाचा एक सुंदर मार्ग मोकळा होतो.
                     " निंदकाचे घर असावे शेजारी !"  स्वत़ाला एवढं सक्षम करायचं कि, मर्यादा क्षमतेमुळे निदान स्तुती आणि निंदा यातील फरक देखील कळेल. सुंदर आयुष्याला अधिक सुंदर आकार येण्यासाठी कधीकधी ' निंदा ' सुद्धा महत्त्वाची आहे, असे माझे मत आहे. कारण त्यामधून आपल्यातील चुका प्रत्यक्षात समोर उभ्या राहतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी एक सुवर्णसंधी मिळते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........