स्वत़ावर प्रेम करा......!

         कोण काय करतंय? कोण कसं दिसतं? कुणाचे कपडे कसे आहेत, त्यांचे विचार कसे आहेत? याकडे लक्ष दिल्यापेक्षा अहो आधी आपण कसं आहोत जरा याकडेही लक्ष द्यायला हवं. ज्यामुळे आपण चांगलंच नव्हे तर आपले विचारही स्मार्ट बनतील. आपलंही नाव कुणाच्या तरी ओठी नाचत असेल.म्हणुनच तर.........  "सोच ब्रॅंन्डेड होनी चाहीए कपडे नहीं"
            जीवनात खरंच यश संपादन करायचं असेल तर आधी स्वत़ावर प्रेम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे स्वत़ावरचा विश्र्वास आणखीनच घट्ट होईल. या सवयीमुळे आपण सतत चांगले गुण त्यासोबत चांगले विचार आचरणात आणू, जे  आपणास चिरकाल सर्वसंपन्न, उत्तम आणि प्रतिभावंत होण्यास प्रेरित करेल  

 "स्वत़ाला घडविण्यातआपला खर्च करा ,
  म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.... तुम्ही उंच शिखरावर जरुर प जगाने तुमच्याकडे पहावं म्हणुन नाही तर,त्या शिखरावरुन तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.....,!"

                रोज सकाळी सूर्योदय होतो आणि सायंकाळी सूर्यास्त होतो, हे दृश्य रोजच बघायला मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन दिवस, प्रत्येक नवीन क्षण काहीतरी नवीन शिकवुन जातो. त्यामुळे विविध अनुभव देखील येतात. नवीन दिवस म्हणजे एकप्रकारे एक अनोखी परीक्षा असते, जी आपल्या समृद्धीसाठी घेतली जाते. ज्यामधे यशापयश हे येतच राहते.
                              "माझा प्रयत्न हा इतरांपेक्षा श्रेष्ठ असला  पाहिजे असं नाही,पण जो मी काल होतो त्यापेक्षा   आज अधिक चांगला  हवा.........!"                                                 जेव्हा एखाद्या वाद्यातून सूर आणि लय एकत्र येऊन सुंदर ध्वनी बाहेर पडते, त्याचप्रमाणे मनामध्ये चांगले विचार, चांगल्या सवयी आत्मसात करणे यांमुळे एक चकाकणार्या आणि उज्ज्वल भविष्याचा सुंदर देखावा बघायला मिळतो. स्वत:वर प्रेम करणे खरंतर हे स्वार्थीपणाचे लक्षण नसून तो एक मार्ग आहे, ज्याद्वारे आपण सतत चांगल्या गोष्टींचा स्विकार करु. जो मार्ग सतत यशोशिखराच्या दिशेनेच चालण्यास प्रेरित करेल. आपल्या क्षमतांचा विकास करण्यास वेळ मिळेल जेणेकरुन वाइट सवयींचा नायनाट करण्यास संधी उपलब्ध होईल. त्यामुळे स्वची ओळख होणार, हे मात्र खरंय. 

  प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं असल्याचा भास होतो; कदाचित ती केलेली तुटलेली  अणकुचीदार काच असते. ती कधी पायात घुसेल नि कधी त्या जखमेचं ग्यांगरिन होईल आणि कधी आयुष्य उध्वस्त होईल, याचा काही नेम नसतो; म्हणुन आपल्या ध्येयासाठी काय चांगलं नि काय वाईट, हे कळलं कि, यशाच्या वाटेवर येणार्या अडचणी आपण हसत- हसत सोडून त्यावर यशस्वीपणे मात करू शकतो. आपण कुणाच्या सोबतीने राहतो, यापेक्षा त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत हे जास्त महत्त्व आहे. जसे कि, आकाशातुन पडलेला एक थेंब थेट हातावर पडला तर,तो पाय धुवायला ही वापरता येत नाही. तो पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर पडला तर तो क्षणार्धात नष्ट होतो. जर तो कमळ पुष्पावर पडला, तर तो मोत्यासारखा चमकतो आणि जर तो शिंपल्यात पडला, तर त्या पाण्याच्या थेंबाचाच मौल्यवान मोती होतो. तो थेंब सारखाच असतो; पण त्याचं अस्तित्व, लायकी व किंमत हे तो कोणाच्या संपर्कात येतो, यावर अवलंबून आहे. 

           तुम्ही स्वत:ला आणि शत्रूला पूर्णपणे ओळखले तर,प्रत्येक युद्धामध्ये यश मिळत जाईल; जर आपण स्वत:ला पूर्णपणे ओळखलं असेल; पण शत्रुबद्दल माहीती नसेल, तर प्रत्येक विजयामागे पराभवसुद्धा चाखावा लागेल.

                   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक नातं....

वाट पाहताना..........!

गणित आयुष्याचं........