Posts

Showing posts from February, 2023

नकळत कित्येकदा पडलेला त्याचा मुडदा......

Image
नकळत कित्येकदा पडलेला त्याचा  मुडदा मी डोळ्यांदेखत पाहीला, न जाणे कोणती ती सहनशीलता देवाने दिली वाट्याला, सारं आयुष्य आणि आनंदाचा उत्सव होतं क्षणीक साथीला, अचानक वादळ आलं, होतं सुख तेही  गेलं, लाभलं दु:ख सोबतीला, चांगली माणसं, चांगले विचार मिळाले श्वासाश्वासाला, सारं काही विरून गेलं, वणव्यानेही  आता रौद्र रूप धारण केलं, थांबला मग तोही अखेर राख देऊनी हाताला, दिवस गेले, क्षणही गेले, काही न उरले हिशोबाला, आठवणींचा तो फापटपसारा मरणासन्न करतो त्याला, पडला तो कित्येकदा, अनेकदा जळून ही विझला, पण आता निघालाय अक्षम्य पंख पसरून आकाश कवेत घ्यायला, _भाउ काळे

मैत्री म्हणजे....

मैत्री म्हणजे ज्वलंत ज्वाला, दु:खातही आनंदाचा प्याला, मैत्री म्हणजे सौख्याची आशा, संकटात ही प्रेरणेची भाषा, मैत्री म्हणजे धागा प्रेमाचा, शब्द कठीण समयी साथ देण्याचा, मैत्री म्हणजे अक्षम्य वारा, क्षणात क्षीण दूर करतो सारा, मैत्री म्हणजे मार्गावर आणणारा धपाटा, राग, प्रेम, भांडणं यांचा भलामोठा साठा....!! _भाउ काळे

श्वास थांबतोच असे नाही......

Image
रस्ता ओलांडताना पाय थबकतोच असे नाही, पाय थबकताना क्षणासाठी श्वास थांबतोच असेही नाही, श्वास थांबताना जीव कासावीस होतो असे नाही, जीव कासावीस झाला कि भीतीने हात धरावा असेही नाही, एकेक पाऊल पुढे स्वछंदीपणे टाकत राहावा असे नाही, पण पाऊल टाकताना थोडा विसावा घ्यावा असेही नाही, विसावा घेताना पाऊलवाटेचाही विसर व्हावा असे नाही, विसर होऊन तिथेच बसावे असेही नाही, स्मरण करावे निरंतर नि गुंतून बसावे त्यातच असे नाही, पण गुंतून ही पुन्हा स्वतंत्र व्हावे असेही नाही, स्वतंत्र होताना विचार करावा बंधनाचा असे नाही, बंधनात ही असताना वावर असावा निरभ्र समुद्राचा असेही नाही, आकाशाची व्याप्ती अशीच मोजता यावी असे नाही, मोजण्यासाठी आकाश..जावं त्याच्याच कवेत असेही नाही, चालतच जावे निरंतर कुठलाही पूर्णविराम न घेता असे नाही, पूर्णविरामानंतर सारं काही नि:श्वास घेत मृत पावते असेही नाही, _भाउ काळे