Posts

Showing posts from June, 2021

माया शेतकरी बाप राब - राब राबतो आहे......

तो शेतकरी बाप माया काया मातीसोबत हिरवे सपान पाहतो आहे, ऊन-वारा-पावसात काबाडकष्ट करीत माया बाप राब-राब राबतो आहे, अधूनमधून जमीनीशी घट्ट नाळ जुळूनही सुटते आहे, निसर्गाची साथ त्याले कधी मधी लाभते आहे, पावसाची जोरदार कळ लागत मधीच तो चाटही देतो आहे, पण तरीही माया शेतकरी बाप राब राब राबतो आहे, कायी माती हेच जणू सर्वस्व मानत त्यात तो सोनं उगवतो आहे, निसर्गाने तोंडाशी आलेला घास गिळल्याने जसा उर फाटतो आहे, अगदी तसंच अंगातली बनियान चिंध्या चिंध्या होईपर्यंत घालतो आहे, पण तरीही माया शेतकरी बाप उरी हिरवे सपान बाळगत राब राब राबतो आहे, वावरात जायचा आन गावाले जाचा बुट एकच हाय नि तो ही भोकं पडेस्तोवर वापरतो आहे, चालताना ना त्याले काट्याकुट्यांची भीती पण लयी पीक व्हावं ही एकच मनात नीती घेऊन तो लढाई लढतो आहे, कधी स्वत:शी तर कधी त्या कृषि केंद्रावाल्याशी, कधी त्या निसर्गाशी आन शेवटी त्या मुर्दाळ नि भिकारचोट व्यापार्यांशी, पण तरीही माया बाप रक्ताचं पानी करत राब राब राबतो आहे, जसा कि आभायात पाहते क्षणी तारा तुटून पडावा आन ती एक इच्छा पूरी होत धनधान्याचा कधी भरमसाठा होतो आहे, निसर्गानं साथ देल्ली त ही कायी ...

मैत्री......

Image
*मैत्री दोन मनामनांची .......!!* *हे जग विविधरंगी नटेश्वर आहे ज्यात व्यक्ती एक पण भावना अनेक आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक व्यक्ती अशी असते आणि असावीही जिचा खांदा अन् मांडी सदैव आपल्यासाठी नि आपलंही त्यांच्यासाठी रितं असावं, ज्यात आपलं सुख-दु:खाचं पात्र उघडं करता यावं. कितीही नाही म्हटलं तरी एखादा ही प्राणी(मानव) असा नसावा कि ज्याला "प्रेम" या सुंदर अन् जगावेगळ्या भावनेशी तिरस्कार ए. त्यातही मैत्रीप्रेम याची तर तर्हाच वेगळी, जिथे कुठलाही स्वार्थ नसतो फक्त नि फक्त एक अनोखा गंध असतो त्या "मैत्रीत" सदैव एकमेकांना साथ देत कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे सोबत राहून पाठीशीच आहे असंच वाटतं जणूकाही....!!* *मला जर कुणी विचारलं, कि या जगात आई-बाबा नंतरचं निस्वार्थी प्रेम अन् नातं कोणतं .....?? तर मी म्हणेल "मैत्री"; कारण ही भावनाच अशी आहे जी दु:खाच्या दुष्काळातही आलेल्या अतोनात दु:खाला सुख नावाच्या झर्याने तहान भागवणारीच अगदी‌. हे असं अविश्वसनीय अन् अनोखं नातं नि बंध आहे दोन मनामनांचा, जो केवळ अनुभवता येतो उघड्या डोळ्यांनी बघता तर येतच नाही...

मासिक धर्म....!!

Image
लहानपणीपासनंच अगदी, जेव्हा काहीही समजत नव्हतं, तेव्हापासून तिच्याठायी कटकट लागलीय भारी, अन् जेव्हा कुठं तिला समजायला लागलं अन् स्वछंदी होऊन ती जगायला लागली मग तिची मासिक पाळी शी भेट झाली न्यारी, ज्यामुळे बाईला बाईपण येत पुढे मातृत्व बहाल होतं अन् विश्र्वाची नवनिर्मिती देखील होती, पण तरीही हे पितृसत्ताक लोकं त्याला कुणी कावळा शिवला, लागाचं नाय, दुर झाली, अपवित्र हाय, अशी नावे का ठेवती, काही तर सेक्सच्या आधीन झालेले अवलिया असतात, जे या काळात 'आचारसंहीता' लागलीय, असेही म्हणती, पण त्या बिचारीला त्रास सहन करावा लागतोय, ओटीपोटासह कळा लागल्याय सार्या, तरीही काही त्याला मदतीचा हात न देती, पाळी आल्यावर आमच्याकडे 'लागाचं नाय' असं म्हणत ते पाच दिवस unlock करत तिला कुठेकुठे बाहेरही ठेवती, पुरूषांनी जर अशावेळी विचारलं अन् त्यात बाबांनी काही काम सांगितलं तर त्यांना 'हो' म्हणत ते करावयास घ्यावं कि त्यांना सांगावच, एवढ्यात तिकडनं आई डोळा काढून बघती, पॅड, नॅपकिन, menstrual कप विकत घेताना, एरवी मोठ्याने बोलणारे आम्हीही, पण इथे का हो आमची पिढी दचकती, पण सेक्स सुरक्षित ...