*लग्न नावाच्या सुंदरतेत तयार होणार्या नात्याला कधी कधी हुंडा नावाचा गिधाड लागल्याने निर्माण झालेली परीस्थिती.......!!*
लग्न नावाच्या सुंदरतेत तयार होणार्या नात्याला कधी कधी हुंडा नावाचा गिधाड लागल्याने निर्माण झालेली परीस्थिती.......!!* *कधी कधी तर वाटते, अन् फार राग येतो कि हे लग्न चाललंय कि बाजार......?? लग्नाच्या नावाखाली फार फार पसाराच मांडून ठेवलाय जणू काही लोकांनी तर... त्यांना तर माणूस म्हणायची ही लाज वाटते. कारण मुलगी तर मुलगी ही द्यावी अन् वरून हुंडा ही द्यावा.... म्हणजे दुकानासारखच काम झालं हे तर. अन् त्यातही मुलगा जर नोकरीवाला असेल तर मग विचारूच नका ...पाच लाख, दहा लाख जसा लिलावच चाललाय.* *कोण्या कोण्या समाजात तर काही वेगळाच प्रकार चाललेला दिसतो, जसं कि दुकानात जाऊन एखादी वस्तु घ्यायला जातो तसंच हा कार्यक्रम चालतो तो म्हणजे मुलगी बघण्याचा ...हो मान्य आहे की, जिच्यासोबत सारं आयुष्य घालवायचं आहे तिला पारखनं लई महत्त्वाचं आहे, पण मग हे करत असताना नटून थाटून जाणं तेही पाहुण्यांसमोर फार द्वेष वाटतो या गोष्टीचा, त्यातही त्यांना आवडली तर ठिक नाहीतर ते नटनं थटनं गेलं चुल्यात.....!! तेव्हाही बरेच प्रसंग असतात, पाहुण्यांसमोर चालून दाखवनं, त्यांना हात दाखवनं, पाय दाखवनं, डोक्यावर पदर घेणं...