Posts

Showing posts from December, 2020

एक ती भीती....

Image
आता व्यक्ती दुरावण्याची भीती मुळीच नाहीये, कुठे तरी थोड्याफार प्रमाणात ती खंबिरता यायला लागली आहे. कारण pure motive ठेवून चांगले पणाने जीवन जगत जावं हेच उद्दीष्ट आहे, तेही निस्वार्थीपणे अन् गुण्यागोविंदाने. त्यामागचं कारणही कळलं आहे, कि कुठलंही नातं असो ते जणू प्रवाहात एकत्र सोडलेल्या काठ्याप्रमाणे असतं ज्यांना जवळही तो प्रवाहच आणतो आणि दूरही तो प्रवाहच नेतो.  सोबतच हेही ध्यानीमनी आहेच कि, आपल्यामुळे कुणाचही मन दूखावलं जातं कामा नये.  हे सर्व करत आयुष्याच्या वळणावरती आनंद घेत जगण्याचा एक अनोखा अनुभव घ्यायचा आहे.
Image
Image

थोडं स्वत:त डोकावून पाहू यात....!!

Image
स्वत:ला   घडविण्यात एवढं गढून जावं कि, सुख अन् दु:ख, एकांत अन् विरह .... यांच्यातील कोडे सोडविण्यासाठी वेळच मिळणार नाही तसेच त्यांचा कडू गोड परिणाम आपल्या मनावर किंचित देखील पडणार नाही. कारण बरेच जण आपल्या आयुष्यात येतात अन् काही मनात घर तयार करता करता निघूनही जातात पण काही मात्र कायमस्वरूपीच ध्यानीमनी राहतात. का .....?? तर कारण माहीतेय पण कोड अजूनही उलगडलेलं नाही, त्या कारणाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर मनाला खोलवर घाव मिळत गेले..... म्हणूनच वाटतं आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी वेगळं शिकवून जाते पण त्यांच्यासाठी तयार झालेलं घर मात्र कायमचंच राहून जातं. त्यामुळेच वाटतं कधी कधी अन् बर्याचदाही ती व्यक्तीच जीवनात येऊ नये जी कधी आपली होऊच शकत नाही तर फक्त आपलं असण्याचा कधी देखावा करणारी....!! कारण त्यामुळे त्या व्यक्तीला काहीही फरक पडणारा नसतो कि, कदाचित आपल्यामुळे तिला ही दुखावलं गेलं असेल. म्हणूनच म्हणतो नकोच ती नाती अन् नकोच ते बंध जे मनाला आतून दूखावणारे.....मनाला पार खोलवर घाव करणारे.... मनाला अक्षरशः तोडून टाकणारे.... अन् नकोच ती व्यक्ती जिच्यामुळे आ...
Image
कधी कधी चालत असताना या जीवनाच्या वाटेवरती आपल्याला  अनेकजण भेटतात; पण त्यातील काहींशी झालेली भेट ही कायमस्वरूपी ध्यानात राहते. त्यातील काहीजण आयुष्य कसं जगावं हे शिकवून जातात तर काही अविस्मरणीय अनुभव देऊन जातात. परंतु प्रेमाने बोललेले त्यांचे ते दोन शब्द चिरकाल ध्यानीमनी राहतात, तर कधी त्याच बोलण्याने मनाचं अतोनात खच्चिकरण होते.  ते बोलणे.... याच गोड मुखातून निघालेल्या दोन शब्दाने मनाचे घाव पुसता येते तर, याच मुखातून निघालेल्या दोन व्यर्थ शब्दांनीच मनाला आरपार घाव होतात. म्हणूनच म्हटलं जातं एकदा झालेला घाव मात्र भरून निघेल पण एकदा निघालेला शब्द पुन्हा परत घेता येत नाही. त्यासाठी कुठे काय बोलावं याच भलंमोठं ज्ञान असणं माणसाला माणूसकी ने परिपूर्ण बणवतं. म्हणूनच म्हणतो ते बोलणे..... ते शब्द असे असावेत जे इतरांनाही आनंद देऊन जाईल..... अनेकांच्या मनातील नकारात्मकता कायमस्वरूपीच नष्ट करुन सकारात्मकतेचं अनोखं बीज पेरले जाईल......  कारण आपण कितीही स्वातंत्र्यपणे जगण्याचा प्रयत्न केला अन् विचारांनीच स्वातंत्र नसलो तर त्या स्वातंत्र्याला स्वातंत्र म्हणताच येणार नाही हो....