Posts

Showing posts from November, 2020
Dr. Shirali Runval Achieved 2539 Awards in 25 years of span.

थोडं ONLINE होऊन जगावं म्हणतो.......

या सोशियल मिडीयाच्या जगात आलोय, तर म्हटलं थोडं जगताना ऑनलाईन होऊन जगावं म्हणतो.... WHATSAPP मध्ये एक चांगलं Option आहे राव ते म्हणजे Block, पण जीवनाच्या WhatsApp मध्ये जेव्हा आणू ते Option तर म्हटलं वाईट विचारांचा बंदच होईल Clock, म्हणूनच आनंदी जीवनासाठी Block हा Option आणावं म्हणतो.... Facebook मध्ये Post हा  Feature फारच भारी आहे,  ज्यामुळे विविध गोष्टींचा होतो सतत प्रचार, अन् जगताना आयुष्याच्या Facebook मध्येही तयार करावं Post हे फीचर, ज्यात करता येईल प्रसार केवळ चांगले विचार, म्हणूनच आपल्या सोबत इतरांचं जीवन सुखी-समा धानी होण्यासाठी Post हे फीचर आयुष्यात आणावं म्हणतो..... WhatsApp उघडल्यावर त्याचा/तिचा Last seen कधी लपून बघावा वाटतो, पण मात्र आपल्या स्वत:मध्ये डोकावून बघितलेला तो Last seen कुठेतरी विसरत जातो, म्हणूनच "स्व" ची खरी ओळख व्हावी यासाठी तो Last seen  बघण्याची कधी वेळच येऊ नये 

चालतांना या आयुष्याच्या वळणावरती.......!!

Image
येतात अनेक अनुभव अन् भेटतात व्यक्ती, चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!! लागतात ठोकरा, येतं कधी कधी अपयश, पण उभं राहावं उत्साहाने अन् घ्यावा एकच ध्यास नि एकच प्रेरणा, चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!! अनेक व्यक्ती येतात अन् भरपूर निघून जातात, पण त्यातील काही देतात अनुभव तर काही देतात लाखोंच्या मोलाच्या शिकवणी, तर त्यातीलच काही अनमोल व्यक्ती धरतात हातात हात कायमस्वरूपी अन् देतात धाडस जगण्याचं, चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!! निसर्गातील प्रत्येक गोष्ट शिकवत असते काही ना काही, पण मात्र ध्यानात ठेवावं सदैव, वाईटातून चांगलं अन् चांगल्यातून वाईट काढून घेण्याचं शिकावं कधीही, चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!! कला असावी अन् शिकावी ही एकतरी जगताना, हास्य असावे क्षणोक्षणी जरी असेलही अनंत दु:ख यातना, चालतांना या आयुष्याच्या वळणावरती....!!                                         - भा.उ. काळे

जगावेगळ्या माणसांच जगावेगळं आयुष्य.......!!

Image
हा ईश्र्वर खरंच खुप कलाकार आहे..... याच माणसांच्या जगात वावरत असताना आलेला हा अनोखा अनुभव. चालता चालता अनेकजण भेटली नि त्यांच्याशी भेटल्यावर अनेक अनुभवांचा खजिना लाभला अन् तेव्हा कुठे कळालं कि, याच जगात एका अनोख्या व्यक्तींचं जगही आहे पण अजुनही माझ्याच समाजाने त्यांना आपलं केलेलं नाही..... खुप खंत वाटते की ती ही सजीवच आहेत मग का त्यांच्याकडे आजही म्हणजेच ३७७ च्या कायद्यानंतरही आपल्या देशातील लोकांच्या माणसिकतेवर अजुनही परिणाम झालाय असं जाणवत नाहीए. मान्य आहे की, ही विचारसरणी ही बदलेल; पण त्या आधी एक चांगला माणूस म्हणून माणूसकीला अंगिकारुन थोड्या त्यांच्याही भावना समजून घ्याव्या म्हणतो....! कारण याच समाजाने त्यांना न स्विकारल्या मुळे त्यांना त्यांची स्वत: ची ओळख स्वत:शीच करून घेणे ही खूप कठीण होते. कारण लोक कीतीही शिकुन मोठं होऊन चांगले विचार ही आत्मसात केलेत पण त्यांना यांच्याबद्दल कधी काही शिकायलाच मिळालं नाही तर इथे त्यांचीही काय चुक म्हणावी. परंतु एक माणूस म्हणून घ्याव्यात समजून त्यांच्याही भावना अन् द्यावा त्यांना आधार खंबीरपणे उभे राहण्याचा हेच सदैव वाटत आले आहे...! कारण मी ब...