Posts

Showing posts from November, 2021

शब्द माझे, भावना तिच्या.....!!

असतात हो अवतीभवती जिवाला जीव लावणारे, सांत्वन घालणारे, भरभरून प्रेम करणारे‌‌.....पण कसंय आपल्याला ज्या व्यक्तीकडनं सांत्वन हवं असतं तेच मिळत नसेल तर खुप खाली खाली वाटतं....!! खुप अस्वस्थता येते....पण असते थोडं समाधान, चला कुणीतरी आहे ना सोबत....आपण एकटं तर नाही ना...!! मग त्या खालीपणाला सोबत घेऊन मानावा लागतो आनंद...!! शेवटी आपण जे दिलं ते तर परत मिळणारच ना..जेवढं प्रेम दिलं तेवढं परत मिळतंच...!! माणूस कितीही स्वार्थी असला तरी हे जग तेवढं स्वार्थी नाही हो...म्हणजे तो एक सिद्धांत आहे ना, ""Law of attraction" चा..!! जेवढं दिलं ते आज ना उद्या मिळणारंच. ह्यावर मात्र पूर्णपणे विश्र्वास आहे हो, म्हणून कुणी आपल्याशी कसेही वागो...तिने मात्र स्वत:चा चांगुलपणा सोडायचा नाही, हा प्रणच घेतलाय जणू असंच वाटायला लागतं ब-याचदा...!!  वाटतं कधी कधी.....ते नात्याला नाव देणं आणि मग चौकटीमध्ये मस्तपैकी बांधल्या जाणं...फार गोड हं..!! हे तरी बरंय त्यांना तुरूंगात तरी बांधलेलं नाही निदान, म्हणजे कसंय तु माझी बहीण ना मग ते ....ते बहीणी एवढंच नातं निभावशील...?? जास्त नाही, बरं का..?? म्हणजे एकदातर...

आजच तर होती हो ती......??

आता असणारी ती माहीत नाही हो कुठे गेली, आजच तिच्याशी बोलणं झालं होतं हो  अन् यानंतर ती फक्त आठवणीतच राहून गेली, मनाने खुप निर्मळ होती हो पण काय सांगावं  तिची संगत आमच्यासोबतची तिथपर्यंत च असावी अन् त्यानंतर ती देवालाही मान्य नसावी, आहे तोपर्यंत... होईल तोपर्यंत... करावं बोलणं अगदी मनापासूनचं... राहावं प्रेमाने सदोदितपणे... भांडण ही करावीत पण मग समजूतही घालावी... कारण आताच असणारी व्यक्ती कायमच सोबत असेल नाहीच ही खात्री, म्हणून सोबत आहे तिथपर्यंत साथ द्यावी आणि आठवणी गोळा करून ठेवाव्यात हृदयाच्या खजिन्यात. ती नाही तर तिच्या आठवणी तरी आनंद देईल....कारण तेव्हा मनाला फक्त एक साद हवी असते काळजाची..!! पण मनच ना हो ते शेवटी स्विकारायलाच तयार नसतं.....अन् त्यात व्यक्ती ही जवळची असेल तर मग मन हे पूर्णपणे गढून जातं त्याच त्या आठवणीत..!!  आज धनतेरस....सर्वांच्या घरातील दिवे लागले अन् ती संगतीने अगदी दिपमाळ तयार करून गेले...मनाला तेजोमय साद घालून गेले, पण त्यांची "ती" सोडून गेली होती अन् त्यांच्या घरात आज अंधाराचीच रात्र होती...!! काय करावं ..?? आठवण तर येणारच ना कारण तेव्हापर्यंतच्या...