माझ्यातील मी....
माझ्यातील "मी" जगत असते कधी स्वतःशी लढते तर कधी स्वतः विरुद्ध उभी राहते, ठोकर लागता पडते कधी कधी सावरते वेळ आली कि ओसंडून वाहते, हसण्याला माझ्या तमा नसते कधी असंख्य गोंधळाला लपवते तर कधी प्रश्नांचा गुंता सोडवते, स्वप्नांची भरारी घेत राहते कधी मेहनत करते तर कधी जिद्द अन् चिकाटीला सोबत ठेवते, स्वातंत्र्य मला आवडते कधी संस्कारांना आठवते तर सदा आई बाबांना स्मरते, माझं आयुष्य मी भरभरून जगते कधी आसमंताला कवेत घेते तर कधी स्वतःच स्वतःचं जग निर्माण करते..!! _भाउ काळे